
सातारा – येथील पाटना तालुक्यातील एका अधिकोषातील कर्मचार्यांनी अधिकोषातील ग्राहकांना ‘आपल्याला मराठी बोलता येत नाही, तुम्हीच हिंदीत बोला’, असे म्हटल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘मराठी एकीकरण समिती’ नावाच्या ‘एक्स’ खात्यावरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक मराठी तरुण बोलतांना दिसत आहे. तरुणाने म्हटले आहे की, या अधिकोषात बहुतांश खाती ही वृद्ध मंडळींची आहेत. या वृद्धांना हिंदी बोलता येत नाही. त्यांना फक्त मराठी भाषा कळते; पण अधिकोषातील कर्मचारी त्यांना हिंदीमध्येच बोलण्याचा अट्टहास करत आहेत; कारण त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. याविषयी अधिकोषातील कर्मचार्याला जाब विचारला असता त्यांनी ‘जा हिंदी शिकून या, आम्हाला तुमची आवश्यकता नाही’, असे उलट उत्तर दिल्याचे या तरुणाने म्हटले आहे. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. अनेक नेटकर्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिका :
|