पंतप्रधानांच्या तोंडी चुकीची विधाने घालून चित्रफीत बनवणार्‍या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद !

नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशाद्वारे चुकीचे आणि दोन समाजांत तेढ निर्माण करणारे विधान करत असल्याची खोटी चित्रफीत भ्रमणभाषमधील ‘स्टेटस’वर ठेवणार्‍या मुख्तार नूरमहंमद सैय्यद नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो पनवेलमधील घोट कॅम्प तळोजा येथे रहातो.

त्याने तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून पंतप्रधानांच्या तोंडी चुकीची धार्मिक विधाने घातली. हे लक्षात आल्यावर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; मात्र चौकशीपूर्वीच त्याने ती चित्रफीत ‘स्टेटस’वरून काढून टाकली आणि भ्रमणभाषमधून पुसून टाकली. (असे केले म्हणून पोलिसांनी कारवाई करायचे टाळू नये. पंतप्रधानांच्या संदर्भात असे कृत्य करणार्‍या धर्मांधाला कठोर शिक्षा व्हायलाच हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अतीमहत्त्वाच्या व्यक्तींविषयी असे कृत्य करण्याचे धाडस धर्मांध करतात, हे लक्षात घ्यायला हवे !