पोलीस विभागातील परिवर्तन आणि ईश्वरी अधिष्ठानाची आवश्यकता !

वरपासून खालपर्यंत सर्व व्यवस्था किडलेली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यामुळे या भ्रष्ट व्यवस्थेला कुणाचेच भय राहिलेले नाही. सर्व व्यवस्था पालटायची असेल, तर पोलीस विभागापासूनच प्रारंभ करावा लागेल. भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांना खड्यासारखे बाजूला काढून उर्वरित चांगल्या कर्मचार्‍यांना घडवावे लागेल. त्यासाठी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिंदुत्वनिष्ठ नेते प्रीत सिंह यांना जामीन संमत

जंतर मंतरवर ऑगस्ट मासामध्ये ‘भारत जोडो आंदोलन’च्या वेळी मुसलमानांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह घोषणा दिल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले ‘सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रीत सिंह यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

हे कायमचे टिकून रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आदी कायदे बनवण्याला पर्याय नाही !

कठोर निर्णय घ्या !

राज्यसभेत १० ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करतांना प्रचंड गोंधळ घातला. काही खासदारांनी बाकावर उभे रहात विरोध दर्शवला. हा एकूण गोंधळ पाहून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांतून अश्रू आले…..

भारत वर्ष २०३० पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करील ! – अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा

वर्ष २०३० कडे पहातांना मला जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल असा भारत दिसतो, असे विधान अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी केले.

लोकशाहीची लक्तरे !

आजच्या सत्ताधार्‍यांनी, म्हणजे कालच्या विरोधकांनीही अशीच कुकृत्ये केलेली असतात. त्यामुळे कोण कुणावर आणि काय कारवाई करणार ? ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’, अशी प्रत्येक राजकीय पक्षाची अवस्था झालेली दिसून येते.

निवडणुकांच्या माध्यमांतून सरकार पालटता येते; पण अत्याचार दूर होण्याची हमी देता येत नाही ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

जे सरन्यायाधिशांना वाटते, ते जनता गेली ७४ वर्षे पहात आहे. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांच्या धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही !

आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका !

नक्षलवाद्यांनी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे ! – छत्रपती संभाजीराजे भोसले,  खासदार, भाजप 

शिवबांचे खरोखर वैचारिक पाईक असाल, तर नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.

लोकशाहीतील न्याययंत्रणेत हरवलेला न्याय !

या प्रचलित व्यवस्थेत सोपा, सहज आणि खरा न्याय मिळेल का ? यांची उत्तरे ‘नाही’, अशी येत असतील, तर ‘आम्ही काय केले पाहिजे’, हा खरा प्रश्न आहे.