‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त नृत्यसेवा सादर करतांना आणि त्यानंतर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. म्रिणालिनी देवघरे हिला आलेल्या अनुभूती

‘रामनाथी आश्रमात असतांना नृत्याच्या सरावाला जाण्यापूर्वी एक दिवस ‘आज नामजपादी आध्यात्मिक उपाय करून सरावाला जाऊया’, असा विचार देवाने मला दिला. आध्यात्मिक उपाय करून नृत्याचा सराव केल्यावर मला पुष्कळ आनंद मिळाला.

प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात नृत्य करण्यासाठी जाणार्‍या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांचा नृत्याचा सराव घेतांना सौ. अनुपमा कानस्कर यांना आलेल्या अनुभूती !

‘प.पू. देवबाबांच्या आश्रमात कु. शर्वरीला नृत्य सादर करायचे आहे’, असा निरोप मिळाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. प.पू. देवबाबांच्या आश्रमात तिच्या समवेत अन्य दोन साधिका (कु. अपाला आणि कु. म्रिणालिनी) नृत्य सादर करणार होत्या.

प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या साधिका नृत्यसेवा सादर करतांना सौ. दीपा औंधकर यांना आलेल्या अनुभूती !

सौ. दीपा औंधकर यांना त्यांच्या मुलीच्या (कु. अपालाच्या) नृत्याच्या सरावाच्या संदर्भात, प.पू. देवबाबांच्या आश्रमात जातांना आणि कार्यक्रमाच्या वेळी नृत्ये पहातांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची साधिका कु. अपाला औंधकर (वय १२ वर्षे) हिला नृत्यसेवा सादर करतांना आलेल्या अनुभूती

‘प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात नृत्य करावे’, असे मला दोन वर्षांपासून वाटत होते. या वर्षी मला ही संधी मिळाली. नंतर आम्ही रामनाथी आश्रमात नृत्याचा सराव चालू केला.

प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांकडून नृत्य आणि गायन सेवा सादर !

१६.६.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिका कु. शर्वरी कानस्कर (कथ्थक), कु. अपाला औंधकर (भरतनाट्यम्) आणि कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम्) यांनी नृत्यसेवा सादर केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी दुर्ग (छत्तीसगड) येथील कु. शर्वरी कानस्कर (वय १२ वर्षे) आणि रत्नागिरी येथील कु. अपाला आैंधकर (वय १२ वर्षे) यांच्या नृत्याच्या वेळी साधिकेला भाव अन् आनंद यांच्या स्तरांवर जाणवलेली सूत्रे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ११.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दुर्ग, छत्तीसगड येथील कु. शर्वरी कानस्कर आणि रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर या बालसाधिकांनी नृत्य सादर केले.

नृत्यातील हात कमळाप्रमाणे करण्याची मुद्रा करताच साधकाच्या हातावर दैवी कण येणे

‘४.३.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी आश्रमात एका संगीत-कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मध्यंतर चालू असतांना नृत्याशी संबंधित काही साधिका नृत्यातील ‘पद्ममुद्रे’चा सराव करत होत्या.

म्हार्दोळ (गोवा) येथील शास्त्रीय नृत्य महोत्सवात नृत्यांगनांनी भावपूर्ण सादर केलेल्या नृत्यामुळे उपस्थितांना आली देवतेची अनुभूती !

बेंगळूरू येथील कुचीपुडी नृत्यांगना कु. प्रतीक्षा काशी यांनी प्रथम देवीसंदर्भातील स्तुती सादर केली. त्यानंतर त्यांनी दशावतार, श्रीकृष्ण पत्नी सत्यभामा यांच्या चरित्रावर आधारित कथानक ‘भामा कल्पम्’, नारायण तीर्थ रचित ‘कृष्णलीला तरंगिणी’ वर आधारित ‘थारांगम्’ हे कुचीपूडी नृत्यातील प्रकार उत्कृष्टरीत्या सादर करत रसिकांची दाद मिळवली.

वणी (यवतमाळ) येथील कु. राजेश्‍वरी तुषार कोंडावार हिचा ‘अखिल भारतीय नृत्य स्पर्धे’त प्रथम क्रमांक !

नागपूर म्युनिसिपल कार्पोरेशन, नागपूर आणि कलाशृंगार नृत्य निकेतन यांनी संयुक्तपणे वयोगटानुसार ‘अखिल भारतीय नृत्य स्पर्धा-२०१९’ चे आयोजन केले होते. या स्पर्धेतील वय ५ ते १० वर्षे या गटात ६ वर्षांच्या कु. राजेश्‍वरी तुषार कोंडावार हिने प्रथम क्रमांक मिळवला.

भरतनाट्यम्चा सराव करतांना कु. सिद्धी सारंगधर यांना आलेली अनुभूती

‘४.५.२०१७ या रात्री ८.३० ते ९.४५ या कालावधीत मी आणि कु. प्रतीक्षा आचार्य भरतनाट्यम्चा सराव करत होतो. त्या वेळी माझा पदन्यास चुकत होता, म्हणजे पदन्यासाकडे लक्ष दिल्यावर त्याला भावजागृतीचा प्रयत्न जोडता येत नव्हता आणि भावजागृतीचा प्रयत्न जोडायला गेले, तर पदन्यास चुकत होता.


Multi Language |Offline reading | PDF