भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर, १४ मार्च (वार्ता.) : कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापिठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, गड-दुर्ग प्रेमी, संघटना, संप्रदाय, तरुण मंडळे, शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २०० हून अधिक ग्रामपंचायतींनी तशा आशयाचे ठराव केले आहेत. या मोर्चाला १७ मार्चला दुपारी ३ वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होईल. यानंतर लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, ‘बी न्यूज’च्या कार्यालयावरून जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याची समाप्ती होईल. तेथे मान्यवरांची भाषणे होतील. या मोर्चासाठी समाजातील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी १४ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोद पाटील, ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘स्वामी समर्थ प्रतिष्ठान’चे श्री. अरुण गवळी, ‘श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिरा’चे श्री. संजय हसबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
🚨 Kolhapur Gears Up for Historic Hindu March! 🚨
On March 17, thousands will march to demand renaming Shivaji University to Chhatrapati Shivaji Maharaj University! 🚩🔥
🔹 @TigerRajaSingh from Bhagyanagar to attend!
🔹 Maharashtra Chamber of Commerce extends support!
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2025
श्री. अभिजित पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.’’
श्री. आनंदराव काशीद म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्गप्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’
|
हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयन महाराज भोसले आणि श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनीही याला पाठिंबा दिला आहे.’’ या प्रसंगी ‘छत्रपती ग्रुप’चे श्री. प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी व्यापक स्तरावर प्रचार होत असून समाजातील प्रत्येकाचा पाठिंबा आहे. चेंबर ऑफ कॉमर्स, विविध संस्था, तरुण मंडळे यांसह विद्यार्थी यांनीही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.’’
|
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चा पाठिंबा !या मोर्चाला ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने पाठिंबा दिला असून या संदर्भात ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्री. ललीत गांधी यांनी कळवले आहे की, ‘‘विद्यापिठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असेच दिले गेले पाहिजे, अशी आमची सर्वांची आग्रही भूमिका आहे. त्यासाठी सर्वांनी २ घंटे दुकाने बंद करून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत.’’ या मोर्चाला ‘श्री’ संप्रदायाने पाठिंबा दिला असून श्री. विजयकुमार पाटील यांनी कळवले आहे की, ‘‘सातारा, सांगली, कोल्हापूरसह बेळगाव येथून ‘श्री’ संप्रदायाचे भक्तगण सहस्रोंच्या संख्येने मोर्चाला उपस्थित रहाणार आहेत.’’ या मोर्चाला ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेनेही पाठिंबा दिला असून कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव यांनी ‘या मोर्चासाठी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत’, असे कळवले आहे. |
हे ही वाचा –
♦ ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार !
https://sanatanprabhat.org/marathi/887269.html
♦ ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्च या दिवशीचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार !
https://sanatanprabhat.org/marathi/889264.html
विशेष१. या मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत. २. या मोर्चात अनेक पथके सहभागी होणार असून यात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, वारकरी-टाळकरी यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी होणार आहे. |