प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे नाशिक येथील नातू पं. गोविंदराव पलुस्कर (वय ८८ वर्षे) आणि त्यांची पत्नी सौ. शालिनी पलुस्कर (वय ८२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

गेल्या ४ – ५ मासांपासून महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी महाराष्ट्रातील अनेक कलाकारांच्या घेतलेल्या भेटी – नाशिक येथील महामहोपाध्याय पं. गोविंदराव पलुस्कर यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत एका अनौपचारिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

मुंबई येथील सतारवादक श्री. सारंग भोसले यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

मिरज येथील श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली यांचीही आश्रमाला पुन्हा भेट

नाशिक येथील संवादिनी (पेटी) वादक श्री. प्रभाकर दसककर (वय ९२ वर्षे) ‘संगीत साधना’ केल्याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्री. दसककरआजोबांच्या जीवनातील अधिकाधिक काळ संगीतातच गेल्याने या माध्यमातून आजोबांनी साधनेत प्रगती करून ते ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले’, हे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेले गोड गुपित कु. तेजल यांनी उपस्थितांसमोर उघड केले.