Devotees At Ayodhya, Varanasi : होळीनंतर भाविकांची अयोध्या, काशी, प्रयाग आणि मथुरा येथे जाण्यासाठी गर्दी !

अयोध्या – होळीनंतर हिंदु भाविकंनी अयोध्या, काशी, प्रयाग आणि मथुरा इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. होळीनंतरच्या दिवसांत अयोध्या आणि वाराणसी येथे जाण्यासाठी विमान आरक्षणामध्ये नियमितच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांत अयोध्या, काशी, प्रयाग आणि मथुरा येथे भेट देणार्‍या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. उत्तरप्रदेश सरकारासह केंद्र सरकार धार्मिक पर्यटनासाठी सतत नवीन पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.

अमृतसर, जयपूर आणि मदुराई यांसारख्या शहरांसाठीही विमानांची मागणी वाढली आहे. येथील बहुतेक हॉटेल्स आधीच भरली आहेत. होळीनंतर एका आठवड्यापर्यंत पर्यटनात मोठी वाढ दिसून येत आहे.