सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना आदरांजली !

हुतात्मादिना’निमित्त हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वहाण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा ‘क्रूर वध’, असा वादग्रस्त उल्लेख करणारे लेखक आणि प्रकाशक यांच्यावर कारवाई करावी !

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा ‘वध’ म्हणून उल्लेख करणे, हा समस्त हिंदूंच्या भावनांचा हा अवमान आहे. याचे गांभीर्य ओळखून हा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करणारे आमदार श्री. जयंत पाटील यांचे अभिनंदन !

मद्यालये, बार आदींना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी कायदा करावा !

‘हे अशासकीय विधेयक सभागृहात चर्चेसाठी घेण्यात यावे’, यावर सभागृहात बहुमताने संमती देण्यात आली. त्यामुळे हे विधेयक पुढील अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.

ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !

ओटीटी अ‍ॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !

नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा !- सावरकरप्रेमी

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.

(म्हणे) ‘उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवा !’ – काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची मागणी

शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्मात कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !

केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करणार !

नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !

प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले.