सातारा शहरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू ! – सौ. दीपाली गोडसे, माजी उपनगराध्यक्षा

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून सप्ततारा सांस्कृतिक मंडळ आणि मित्रसमूह आपली परंपरा जोपासणार आहे. मंडळाकडून कोरोनाविरोधातील लढ्याला साहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्षा सौ. दीपाली राजू गोडसे यांनी दिली.

गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय राज्यासाठी अनुकरणीय ! – अजित पवार

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून राज्यासाठी ही अनुकरणीय गोष्ट आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा मानाच्या गणेशोत्सव मंडळांचा निर्णय

शहरातील मोठ्या प्रमाणात साजर्‍या केल्या जाणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जगविख्यात आहे; पण यावर्षी कोरोनाच्या संंकटामुळे गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

लाखो गणेशमूर्ती सिद्ध झाल्या असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदीचा निर्णय पुढे ढकलावा ! – पेण (रायगड) येथील मूर्तीकारांची मागणी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आगामी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर घातलेली बंदी आणि अन्य अनेक निर्बंध, यांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक मूर्तीकारांना फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मूर्तीकारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.