मद्यधुंद टँकर चालकाने १५ वाहनांना ठोकले : ७ जण गंभीर

मद्य पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.

कराड येथे मृत पक्षी आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण

पक्षी कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, याविषयी अजून कोणतेही निदान झालेले नाही.

बनावट नोटा देऊन शेतकर्‍याची फसवणूक करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात

बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे.

सनातनचे हितचिंतक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक गुरुप्रसाद जयस्वाल यांचे निधन !

सनातनचे हितचिंतक गुरुप्रसाद नत्थुलाल जयस्वाल (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ जानेवारी २०२१ या दिवशी दुःखद निधन झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले 

या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचसमवेत सांगली, विश्रामबाग आणि मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली.

मेट्रोच्या स्थानकाजवळ राजभवनावर जाणारा मोर्चा अडवला !

सहस्रोंच्या शेतकर्‍यांचा मोर्चा राजभवनाकडे निघाला होता. तो मेट्रो स्थानकाच्या बाहेरील चौकात अडवण्यात आला. मेट्रो चौकात दुपारी ३ ते ४ या वेळेत मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली.

गणेश मार्केट येथील शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन 

प्रारंभी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी एन्.सी.बी.च्या मुंबई पाठोपाठ पुण्यातही धाडी

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एन्.सी.बी.) पथकाने मुंबई पाठोपाठ पुण्यातील हडपसर आणि खडकवासला परिसरात धाडी टाकल्या.