Mahakumbh 2025 : हिंदु जनजागृती समितीने घेतली मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज यांची भेट

या मंगलप्रसंगी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देत कुंभक्षेत्री असलेल्या समिती कक्षावर येण्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले.

Sri Sri Ravi Shankar At Mahakumbh : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री श्री रवीशंकर यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान !

गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगल्याप्रकारे चालू आहे. समितीच्या कार्याविषयी मला माहिती आहे’, असे सांगून कार्याला आशीर्वाद दिला.

केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश नव्हे, तर संपूर्ण जगातील पीडित हिंदूंना भारतात आश्रय मिळावा !

आज केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील नव्हे, तर श्रीलंका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या अनेक देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर भेदभाव, बळजोरीने धर्मांतर, सामाजिक आणि आर्थिक त्रास दिला जात आहे…

Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत.

Prayagraj Kumbh Parva 2025 – HINDU RASHTRA ADHIVESHAN : महाकुंभपर्वात साधुसंतांचा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

अर्जुनाला ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. वर्तमान काळातही हिंदु राष्ट्राच्या विरोधी ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व समजून घेतले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल !

हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी ! – पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणारे डॉ. ओमेंद्र रत्नू

हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी भेट दिली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित सत्संगाचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘स्वतः ऋषिमुनी आणि महर्षि यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरित्राचे लिखाण करणे’, हीच सूक्ष्म विश्वातील एक दैवी घटना आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा सन्मान !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’चे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची दुपारी भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.

Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभक्षेत्री पदयात्रेद्वारे घुमला हिंदु राष्ट्राचा हुंकार !

अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ या दिवशी १ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभप्रसंगी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी येथे ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ काढण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राचा हुंकार घुमला.