सिंधुदुर्ग जिल्ह्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले स्मारक झरेबांबर येथे उभारले !

झरेबांबर तिठा येथे उभारण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक

दोडामार्ग – छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलीदानातून प्रेरणा मिळावी आणि धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी धर्मवीर बलीदान मासात तालुक्यातील झरेबांबर तिठा येथे एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक शिवशंभू प्रेमींनी उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचे हे भव्यदिव्य स्मारक जिल्ह्यातील पहिले स्मारक असल्याचे सांगितले जात आहे.

देव, देश आणि धर्म यांसाठी स्वतःचे बलीदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक प्रत्येक ठिकाणी व्हावे. यातूनच हिंदु धर्म जागृत ठेवण्याची भावना प्रत्येक हिंदूच्या मनात रुजेल. या हेतूने शिवशंभू प्रेमी आणि धारकरी काम करत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात काहींनी अंगमेहनतीने, काहींनी वस्तू स्वरूपात, तर काहींनी आर्थिक स्वरूपात हातभार लावला आहे. यातूनही ११ मार्चच्या रात्री हे स्मारक उभारले गेले. या स्मारकाची देखभाल तालुक्यातील शिवप्रेमी करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.