सोरायसिस, त्वचारोग आदींवर पंचगव्य उत्पादनांद्वारे उपचार करणे शक्य ! – राष्ट्रीय कामधेनू आयोग

रोगांवर पंचगव्य (गायीचे दूध, मूत्र, शेण आदींचे मिश्रण) उत्पादनांद्वारे उपचार करण्यात येऊ शकतात,

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमणे ! – भाजपचा आरोप

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपचे १५ कार्यकर्ते घायाळ झाले

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

१२ ते १६ जानेवारीपर्यंत प्रतिदिन भजन, कीर्तन, प्रवचन, हळदी-कुंकू, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

(म्हणे) ‘काश्मीरला स्वायत्त दर्जा मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही !’ – पाकचे इम्रान खान

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहातील समस्यांविषयी महापालिका आयुक्तांना निवेदन

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या विविध समस्यांविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था मिरज यांच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले.

बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मींचे मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन 

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मीनी ९ जानेवारी या दिवशी नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. नाट्यगृहात कलाकार, नाट्यकर्मी, प्रेक्षक यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे.

गूगलने चोपना (मध्यप्रदेश) येथील राष्ट्रीय उद्यान दाखवले पाकमध्ये !

गूगलकडून बैतुल येथील चोपना क्षेत्र पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवत असल्याने येथील नागरिक संतप्त असून यांनी गूगलविरुद्ध तक्रार करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये नियमांचे उल्लंघन करून बढती मिळवणार्‍या ४ अधिकार्‍यांची थेट चौकीदार, कारकून आदी पदांवर नियुक्ती !

अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्‍वती देता येणार नाही !

हुबळी मार्गे जाणार्‍या १९ रेल्वे गाड्या रहित

नैऋत्य रेल्वे विभागातील असणार्‍या हुबळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने वेगवेगळ्या दिवशी एकूण १९ रेल्वे गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे.