मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

मुंबई – येथील प्रामुख्याने कोळी समाजाची वसाहत असणार्‍या मालवणी भागातील शेकडो हिंदु परिवारांनी गेल्या १० वर्षांत पलायन केले आहे. धर्मांधांचा दबाव, छळ, धमक्या, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, युवतींची छेडछाड आदी विविध प्रकारे अत्याचार करून दंगलसदृश वातावरण निर्माण करण्याला भिऊन आणि कंटाळून येथून पलायन केल्याने येथील हिंदु अल्पसंख्यांक झाल्याचे आता प्रकर्षाने पुढे येत आहे.

भाजप मुंबई चे एम. पी. लोढा स्थानिकांशी संवाद साधतांना…

बहुसंख्य हिंदूंनी हा भाग सोडण्याचे मुख्य कारण ‘मुलीची छेड काढली जाणे’ हेच आहे. येथील मशिदीच्या कारणासाठी गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती न बसवणार्‍या येथील निधर्मी हिंदूंनाच आता ‘४० लाखमे घर बेचकर चले जाव’ अशा धमक्या मिळत आहेत. अनेक जण याला बळी पडले असून अनेक जण बळी पडण्याच्या मार्गावर आहेत. याविषयीचे सविस्तर वृत्त ‘न्यूज डंका’ न्यूज पोर्टलने प्रसारित केले आहे.

येथे ‘बंगाली मुस्लिम फेडरेशन’ नावाची संस्था स्थापन झाली असून त्यातील सदस्य बांगलादेशी आहेत कि रोहिंग्या आहेत, हेही कुणाला माहीत नाही, असेही यात पुढे म्हटले आहे.

हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!

https://www.newsdanka.com/vishesh/2712/2712/

Posted by News Danka on Wednesday, January 13, 2021

या वृत्तात दिलेली सूत्रे . . .

१. येथील छेडा कॉम्प्लेक्समध्ये हाताच्या बोटावर मोजणारे मुसलमान होते. तेथे आता केवळ हाताच्या बोटावर मोजणारे हिंदु शिल्लक राहिले आहेत. या इमारतीच्या दारात वर्ष २०१८ मध्ये अनधिकृत मशीद उभारण्यात आली. महापालिकेने तिच्यावर कारवाई करायला घेतली होती; परंतु ती पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे या मशिदीचे बांधकाम वाढवून ते आता वहीवाटेच्या रस्त्यापर्यंत करण्यात आले आहे.

२. सवेरा ही इमारत जमील मर्चंट या गुंडाने त्याचे पाणी आणि वीज तोडून दळणवळण बंदीच्या काळात न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत रिकामी करवून घेतली आहे. येथील नागरिकांच्या निदर्शनांचाही काही उपयोग झाला नाही.

३. येथील ब्लॉक क्रमांक ७ मधील हिंदु भाजी विक्रेत्यांची जागा मुसलमान विक्रेत्यांनी घेतली आहे. ४ वर्षांपूर्वी येथे मदरसा उभा राहिला आणि नंतर वर्षभरात त्याची मशीद झाली.

४. याच परिसरात आणखी एक अनधिकृत मशीद म्हाडाच्या जागेवर आहे. ३ वर्षांपूर्वी ही मशीद उभी राहिल्यावर हिंदूंच्या घरात पाणी फेकणे, लोखंडी सळई फेकणे, हिंदु तरुणांवर जमावाने आक्रमण करणे, महिलांची छेड काढणे, असे प्रकार येथे नित्याचे झाले आहेत.

५. सय्यद हाशम या गुंडाचे अमली पदार्थांची विक्री, वेश्याव्यवसाय असे अनधिकृत धंदे चालतात. स्थानिकांनी याविरोधात तक्रारी केल्याने कारवाई झाली; परंतु तक्रार करणार्‍यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या दिल्या आणि परत ते धंदे चालू केले. येथील रहिवासी तक्रार करायला जातात, तेव्हा पोलीस अदखलपात्र तक्रारही नोंदवत नाहीत. येथील एका हिंदु रहिवाशाने पोलीस उपायुक्तांना लेखी तक्रार केली आहे.

६. येथील महापालिकेच्या मराठी, गुजराती आणि हिंदी शाळा बंद पडून अमली पदार्थांचे अड्डे अन् वेश्या व्यवसायाचे केंद्र बनल्या आहेत, तसेच फेरीवालेही येथे आहेत, तर ऊर्दू माध्यमाच्या शाळा वाढल्या आहेत.

७. येथील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना कडक नियम आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात मशीद आल्यावर ढोल-ताशे बंद करावे लागतात. पोलीस ते काटेकोरपणे करून घेतात.

८. अश्‍लील भाषा वापरणे, शिट्या, धक्काबुक्की, छेडछाड आदींचा त्रास सहन करणे येथील युवती आणि महिला यांच्यासाठी नित्याचे झाले आहे. रस्त्यावर धर्मांध युवकांच्या टोळ्या हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी फिरत असतात. त्यामुळे हिंदु मुलगी घरातून बाहेर गेल्यावर ती घरी येईपर्यंत ताणाचे वातावरण रहाते. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी करूनही काहीही उपयोग झालेला नाही.

९. एम्.एच्.बी. कॉलनीत छोटे हॉटेल घालून तेथे व्यवसाय करणार्‍या हिंदु महिलेला हे हॉटेल काढून टाकण्यासाठी धमकावण्यात आल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात आहे.

 (सौजन्य : News Danka)

१०. मालवणी नजीकच्या अंबोजवाडी येथील सरकारी जागेवर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या असून त्या मुसलमानांना अत्यंत स्वस्तात विकल्या जात आहेत.
येथील हिंदू वरील प्रकारचे अत्याचार सहन करत आहेत; कारण धर्मांधांना काही शिक्षा होत नाही. पोलीस ठाण्यात तक्रारी करून काहीही उपयोग झालेला नाही, अशी व्यथा मालवणी भागातील हिंदूंनी मांडली आहे.