|
सावदा (जिल्हा जळगाव) – वाघोदा बुद्रुक, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथे मशिदीच्या बाजूच्या शेडमध्ये गोवंशियांच्या मांसाची विक्री होत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथे धाड घातली. तेथून नईम शेख अयुब कुरेशी (वय ४७ वर्षे) याला कह्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १२ सहस्र रुपये किमतीचे ६० किलो मांस कह्यात घेण्यात आले. वजन काटा, मांस कापण्यासाठीचा सुरा, रोख रुपये आदी साहित्यही कह्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सावदा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जनतेला आवाहन केले की, ज्या ज्या ठिकाणी गोवंशियांच्या मांसाची विक्री होत असेल, त्याविषयी पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि माहिती देणार्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. (नागरिकांना ज्या वेळी अशा घटना लक्षात येतात, त्याविषयी ते पोलिसांना सांगताताच; पण पोलिसांना या घटनांची माहिती का मिळत नाही ?, हा प्रश्न आहे. पोलिसांनीही सतर्क राहून अशा घटनांचा मागोवा घ्यावा आणि नागरिकांच्या माहितीची वाट न बघता त्वरित कारवाई करावी ! – संपादक)
संपादकीय भूमिकागोमांसाची विक्री रोखली, हे चांगलेच आहे; पण गोवंशियांची हत्याच होऊ नये, यासाठी सरकार आणि पोलीस काय करणार ?, हेही जनतेला समजायला हवे ! |