श्रीरामजन्मभूमी विशेषांक

रविवार, १७ नोव्हेंबर २०१९ या दिवशी वाचा दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक !
• आपली प्रत आजच नोंदवा ! • स्थानिक वितरकांशी संपर्क साधावा.

सरकार अधिग्रहित ६७ एकरमध्येच आम्हाला ५ एकर भूमी द्या अन्यथा नको ! – बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी

मक्का किंवा मदिना येथे हिंदूंनी मंदिरासाठी जागा मागितली असती, तर चालले असते का ? यातून अन्सारी यांची धर्मांधता दिसून येते !

राममंदिराविषयीचा आराखडा आणि न्यासाचे स्वरूप यांविषयी तडजोड करणार नाही ! – विहिंपची चेतावणी

राममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे विश्‍व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी म्हटले आहे.

वादग्रस्त धार्मिक स्थळांविषयी नवीन याचिका करता येणार नाही

रामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल रामललाच्या बाजूने लागला असला, तरी ‘प्लेसेस ऑफ वरशिप’ (विशेष तरतूद) या कायद्यामुळे देशातील अन्य वादग्रस्त धार्मिक स्थळांविषयी नवीन याचिका प्रविष्ट करता येणार नाही. यामुळे काशी आणि मथुरा या मंदिरांचा प्रश्‍न निकाली काढण्यात अडचणीचे ठरणार आहे.

हिंदूंना २.७७ एकर, तर मुसलमानांना ५ एकर जागा का ? – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा निकाल देतांना ‘अयोध्येतील २.७७ एकर जागा राममंदिराला देण्यात यावी, तर अन्यत्र ५ एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी’, असे म्हटले आहे.

रामजन्मभूमीवरील रामललाच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ

रामजन्मभूमी खटल्याचा निकाल रामललाच्या बाजूने आल्यानंतर रामललाच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ९ नोव्हेंबर या दिवशी ५ सहस्र भाविकांनी दर्शन घेतले.

भारतात राहायला आवडत नसेल, तर ओवैसी यांनी पाकिस्तानात जावे ! – महंत नरेंद्र गिरी, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य न करणे, हा देशद्रोह आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी भारत आणि हिंदू यांच्या विरोधात विष ओकत असतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; राममंदिरासाठी सोन्याची वीट देणार ! – बाबरचे वंशज

रामजन्मभूमी निकालामुळे बाबरच्या नावाची अपकीर्ती करणार्‍यांना एक धडा शिकवला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक आणि स्वागतार्ह असून तो आपण सर्वांनी मनापासून स्वीकारला पाहिजे.

मुसलमानांनी ५ एकर भूमीत शाळा उभारावी ! – सलीम खान, चित्रपट निर्माते

अयोध्येमध्ये मुसलमानांना देण्यात येणार्‍या ५ एकर भूमीत शाळा उभारली पाहिजे. मुसलमानांना मशीद नाही, तर शाळा आणि महाविद्यालये यांची आवश्यकता आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माते सलीम खान यांनी केले आहे.

मुसलमानांना भूमी देणे अयोग्य ! – ज्योतिष आणि द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

हिंदूंच्या हिताच्या बाजूने निर्णय आला, हे खरे आहे. हे स्पष्ट झाले आहे की, वादग्रस्त भूमी हिंदूंची आहे. त्यामुळे मुसलमानांना भूमी देणे अयोग्य आहे.