कोलार (कर्नाटक), १४ मार्च (वार्ता.) – कर्नाटक सरकारने सरकारी ठेक्यांमध्ये मुसलमान समाजासाठी ४ टक्के आरक्षण लागू केल्यानंतर आता ‘कर्नाटक राज्य अल्पसंख्याक अभियंता संघटने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री जमीर अहमद खान यांच्याकडे ‘मुसलमान समाजाला शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांत असलेले आरक्षण १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. मंत्री जमीर अहमद खान यांनी या मागणीला त्वरित प्रतिसाद देत तातडीने यासंदर्भात उपाययोजना काढण्याचा आदेश संबंधित अधिकार्यांना दिला. (यावरून राज्याचे धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळ नव्हे, तर अल्पसंख्याक समुदायाचे मंत्री जमीर अहमद खान घेतात का ?, असा प्रश्न पडतो ! – संपादक)
सध्या राज्य सरकार मुसलमान समाजाला शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांत ४ टक्के आरक्षण देत आहे. नुकत्याच घोषित झालेल्या कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारी ठेक्यांमध्ये मुसलमान समाजाला ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य अल्पसंख्याक अभियंता संघटनेने वरील मागणी केली आहे.