Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित !

हिंदु जनजागृती समितीचे समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे, तसेच हिंदु राष्ट्राविषयीचे कार्य जाणून घेतल्यानंतर श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित झाले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला गुरुकार्ष्णि शरणानंद महाराज आणि महंत बालकनाथ यांचे आशीर्वाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाकुंभक्षेत्री साधू-संतांच्या भेटी घेतल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.

हिंदु जनजागृती समितीने घेतली पंचायती निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी कैलाशानंद गिरि यांची भेट !

आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी कैलाशानंद गिरि हे पंचायती निरंजनी आखाड्याचे प्रमुख आहेत. त्यांची भव्य छावणी सेक्टर क्रमांक ९ येथे आहे.

Mumbai HC On HJS PIL : श्री तुळजाभवानीदेवीचे सोने-चांदी वितळवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे देवस्थानातील अपहार आणि भ्रष्टाचार रोखण्यास हातभार लागला आहे. श्री तुळजाभवानीदेवीच्या संपत्तीचे रक्षण आणि अपहार करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही न्यायालयीन लढा चालूच ठेवू – श्री. सुनील घनवट

Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभक्षेत्री पदयात्रेद्वारे घुमला हिंदु राष्ट्राचा हुंकार !

अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ या दिवशी १ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभप्रसंगी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी येथे ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ काढण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राचा हुंकार घुमला.

‘बी’ न्यूजच्या ‘संवाद-प्रतिवाद’मध्ये मंदिर महासंघ आणि कुंभमेळा यांवर विशेष कार्यक्रम !

कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी ‘बी’च्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात वाहिनीचे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट अन् हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वय श्री. किरण दुसे यांची विशेष मुलाखत घेतली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : घाणेरड्या पाण्यात धुतलेले पनीर आणि मिठाई यांची भाविकांना विक्री !

प्रयागराज येथे पनीर आणि मिठाई यांची विक्री करणारे ३-४ विक्रेते घाणीच्या पाण्यात पनीर आणि मिठाई धुवून त्यांची भाविकांना विक्री करत असल्याची गोष्ट निदर्शनास आली.

Halal Food in Train : ‘मुंबई-हावडा एक्सप्रेस’मध्ये प्रवाशांना सक्तीने हलाल चिकन देत असल्याचे उघड !

अन्य धर्मियांचे लांगूलचालन करत हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा अधिकार भारतीय रेल्वेला कुणी दिला ?