महर्षींच्या आज्ञेने ‘कार्तिक दीपम् (देवदिवाळी)’ या दिवशी ‘वण्णामलई’ (तमिळनाडू) या पर्वताला प्रदक्षिणा घालतांना साधकाला जाणवलेली सूत्रे
आम्ही सकाळी प्रदक्षिणेस आरंभ केला. तेव्हा तिरुवण्णामलई पर्वतावर पुष्कळ धुके होते. त्यामुळे त्याचे पूर्ण दर्शन होत नव्हते. आमची प्रदक्षिणा संपत आल्यानंतर थोडा वेळ ऊन पडले आणि आम्हाला पूर्ण पर्वताचे दर्शन झाले. दर्शन झाल्यावर भगवान शिव आणि तिन्ही गुरु यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.