
प्रयागराज, २५ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी २४ जानेवारी या दिवशी आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि यांची भेट घेतली. आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि हे पंचायती निरंजनी आखाड्याचे प्रमुख आहेत. त्यांची भव्य छावणी सेक्टर क्रमांक ९ येथे आहे. या वेळी समितीचे पश्चिम उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथील समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके हेसुद्धा उपस्थित होते.

या वेळी स्वामी कैलाशानंद गिरि यांना श्री. घनवट यांनी ३१ जानेवारी या दिवशी प्रयागराज येथे होणार्या हिंदु अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले. स्वामीजींनी ‘मी तुम्हाला ओळखतो. सध्या आखाड्याच्या बैठका चालू असल्याने मी व्यस्त आहे. माझे आशीर्वाद आहेत’, असे सांगितले.