Mahakumbh 2025 : कुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीने घेतली संत-महंतांची भेट
समितीच्या कार्याला अनेक आशीर्वाद
समितीच्या कार्याला अनेक आशीर्वाद
श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.
गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगल्याप्रकारे चालू आहे. समितीच्या कार्याविषयी मला माहिती आहे’, असे सांगून कार्याला आशीर्वाद दिला.
भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल.
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने वक्फ बोर्डाला हटवून सनातन बोर्डाची स्थापना करावी, असा निर्धार करण्यात आला आहे. त्याविषयी आम्ही बैठका घेऊन जागृती करत आहोत. भारत हा राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र नाही. आज आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमत हवे आहे.
‘विद्येच्या मंदिरा’मध्ये (शाळेत) ड्रोसकोड (गणवेश) चालतो, ‘न्यायाच्या (न्यायालय) मंदिरा’त ड्रेसकोड (गणवेश) चालतो, तसेच ‘लोकशाहीच्या मंदिरा’तही (विधान भवन) येथे ड्रेसकोड चालतो, तर मग केवळ मंदिरातील ड्रेसकोडवर आक्षेप का ?
कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.
महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे, तसेच हिंदु राष्ट्राविषयीचे कार्य जाणून घेतल्यानंतर श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित झाले.