प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज – हिंदु जनजागृती समितीचे समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे, तसेच हिंदु राष्ट्राविषयीचे कार्य जाणून घेतल्यानंतर श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित झाले. समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तसेच गोवा येथे होणार्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येण्याचे निमंत्रणही दिले.
श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजींनीही अधिवेशनाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.