चेन्नई येथे श्राद्धविधीच्या वेळी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

सनातनचे साधक श्री. जयकुमार यांच्या वडिलांच्या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने १५ मार्च २०२० या दिवशी चेन्नई येथे सनातनच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थित नातेवाइकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला.

सोलापूर येथे दत्तजयंतीनिमित्त लावलेल्या ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री कक्षाला समाजाकडून मिळालेला उल्लेखनीय प्रतिसाद !

‘दत्तमंदिराजवळ जेथे ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री कक्ष लावायचे नियोजन होते, तेथेच पुष्कळ वाहने उभी केलेली होती. आम्ही साधिका ती वाहने बाजूला एका ओळीत लावत होतो.