होत असलेल्या एखाद्या त्रासावर प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने एकदा उपाय शोधल्यास पुढे तो प्रतिदिन न शोधता १५ दिवसांनी पुन्हा शोधावा आणि तोवर तोच उपाय करावा !

‘सध्या साधक स्वतःला होत असलेला त्रास दूर करण्यासाठी प्रतिदिन प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार नामजप शोधतात आणि त्यानुसार नामजप करतात…

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सनातनच्या एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ईश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असतात. ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी आवश्यक असे सूक्ष्मातील ज्ञान त्यांना ईश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळते. ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या अंतर्गत आवश्यक सूक्ष्मातील पैलूंचा अभ्यास श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दायित्वाने पहातात. 

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सर्व गुणांचा मुकुटमणी ‘प्रीती’ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात अन्य पुष्कळ गुण असले, तरी त्यांच्यात सर्वांत महत्त्वाचा गुण (मुकुटमणी) आहे, तो म्हणजे प्रीती !

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती

सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी माझ्‍या मनात आलेले कर्तेपणाचे विचार गुरुचरणी अर्पण करण्‍यास सांगितले, तरीही माझ्‍या मनात पुनःपुन्‍हा अहंचे विचार येत होते. तेव्‍हा मी ‘सद़्‍गुरु गाडगीळकाका माझ्‍यातील अहं नष्‍ट करत आहेत’, असा भाव ठेवत जप करू लागले. त्‍या वेळी माझ्‍या सप्‍तचक्रांवर उपाय झाले. मला माझ्‍या डोळ्‍यांवर उपाय करतांना वेगळा भाव जाणवला.

रवि आणि शनि या ग्रहांचा जप करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती

माझ्‍या पाठीमागे मला शनिदेवाचे अस्‍तित्‍व जाणवले आणि माझा भाव जागृत झाला. मला शनिदेवाचे रूप इत्‍यादी दिसले नाही; पण त्‍यांचे अस्‍तित्‍व मात्र जाणवले.

नेवासा, अहिल्यानगर येथील ‘संगीतगुरु’ (‘संगीत अलंकार’) सौ. सीमंतीनी बोर्डे संगीताच्या विद्यार्थ्यांना विविध राग शिकवतांना त्यांना आलेल्या सूक्ष्मस्तरीय अनुभूती !

‘सौ. सीमंतीनी बोर्डे या ‘संगीत’ हा विषय घेऊन ‘एम्.ए.’ झाल्या आहेत, तसेच त्या ‘संगीतगुरु’ही (‘संगीत अलंकार’) आहेत. त्यांच्या संगीत वर्गात विद्यार्थ्यांना विविध राग शिकवतांना त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीमती मनीषा गाडगीळ निवास करत असलेल्या आश्रमातील खोलीत झालेले पालट !

‘सनातनच्या पहिल्या संत प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी यांच्या कन्या श्रीमती मनीषा गाडगीळ गोवा येथील आश्रमाच्या निवासस्थानी मागील ३ वर्षांपासून रहात आहेत. त्या रहात असलेल्या खोलीतील लादी आणि भिंत यांवर पांढर्‍या रंगाचे गोल ठिपके उमटले आहेत.

साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतांना ‘सौ. सुप्रिया माथूर यांच्‍यात कोणते पालट जाणवतात ?’, याविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात झालेले संभाषण

६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुप्रिया सुरजीत माथूर साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात साधकांना ‘सुप्रियाताईंमध्‍ये कोणते पालट जाणवत आहेत ?’, याविषयी झालेल्‍या संभाषणाचा काही भाग १९ नोव्‍हेंबरला पाहिला. आज पुढील भाग पाहूया.  

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करून स्वतःमध्ये सकारात्मक पालट करणार्‍या कु. मधुरा चतुर्भुज !

‘कु. मधुरा मोहन चतुर्भूज हिला वर्ष २००४ पासून आध्यात्मिक त्रास होऊ लागला. तिने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यानंतर तिच्यामध्ये बरेच पालट झाल्याचे मला जाणवले. ते पालट येथे दिले आहेत.

साधना करून व्यक्तीने उच्च आध्यात्मिक पातळी गाठल्यास तिचे नाव, आडनाव, वेशभूषा अशा तिच्या कोणत्याही गोष्टीचा तिच्या स्वतःवर परिणाम होत नसणे

व्यक्तीवर होणारा आडनावाचा परिणाम हा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरावरील आहे. जर एखादी व्यक्ती साधना करून पंचतत्त्वांच्याही पुढच्या स्तरावर, म्हणजे निर्गुण स्तरावर गेल्यास तिच्यावर आडनावाचा परिणाम होणार नाही…