सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

पू. डॉ. शिवकुमार ओझा यांची भेट झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी त्यांच्याकडून ‘स्वतः ‘आय.आय.टी.’मध्ये एक प्राध्यापक असूनही अध्यात्माचा इतका सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ?’, हे समजून घेतले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेज पाहून संत तुकाराम महाराज यांच्या ‘राजस सुकुमार…’ या अभंगाची प्रचीती मिळते ! – सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित डॉ. केशव गिंडे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गौरवास्पद कार्याविषयी आणि त्यांच्या सहवासात आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी पू. पंडित डॉ. केशव गिंडे संतवचनांतून सांगत आहेत . . .

हिंदु जनजागृती समितीकडून साध्वी सत्यप्रिया यांची सदिच्छा भेट

‘दुर्गा वाहिनी’च्या साध्वी ऋतंभरा यांच्या कृपाप्राप्त साध्वी सत्यप्रिया यांच्या श्रीरामकथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी साध्वी सत्यप्रिया यांची भेट घेतली.

मंदिरे धर्मकार्यासाठी कशी कार्यान्वित होतील, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

आपण देव, देश आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्यानेच सद्गुरु संतुष्ट होतात. आपल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबर देव, देश आणि धर्म यांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली पुढची पिढी राष्ट्रभिमानी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली सदिच्‍छा भेट !

या वेळी सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांना ‘लव्‍ह जिहाद’, ‘हलाल जिहाद ?’ आणि ‘हिंदु राष्‍ट्र का हवे ?’, हे हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिले. या वेळी पंडित मिश्रा यांना सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी आश्रमाला भेट देण्‍याविषयी निमंत्रण देण्‍यात आले.

हिंदूंनी धर्मासाठी वेळ देण्‍याची आवश्‍यकता ! – अनंत विभूषित महामंडलेश्‍वर स्‍वामी ऋषिराजजी महाराज

स्‍वामी ऋषिराजजी महाराज सांगोला येथील गोवा स्‍टील सेंटरचे मालक भीमारामजी चौधरी यांच्‍या निवासस्‍थानी आशीर्वाद देण्‍यासाठी आले होते.

‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्‍थापक श्री श्री भगवान यांच्‍या ८२ व्‍या जन्‍मोत्‍सवामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री श्री भगवानजी यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शुभेच्‍छा पत्र पाठवून कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथील ग्रंथप्रदर्शन कक्षांचा प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथे सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ प्रदर्शन कक्ष यांचा प्रारंभ करण्यात आला. याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात आमचा पूर्णपणे सहभागी राहील ! – पू. डॉ. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज, शंकर मठ, राजारामतला, हावडा (बंगाल)

‘‘तुम्हाला कोणते कार्य करायचे आहे, ते ठरवा आणि आम्हाला सांगा. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात आमचा पूर्णपणे सहभाग राहील.’’

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.