हिंदूंच्या साधू-संतांवरील आक्रमणांचे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवावे !

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. संतांच्या हत्यांचे अन्वेषण जलद गतीने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता कार्यशाळेचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता कार्यशाळेचे आयोजन २१ मे या दिवशी करण्यात आले होते.

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात अधिवक्त्यांनी सामाजिक माध्यमांतून व्यक्त व्हावे ! – पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषद

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानचे सोने घेण्याच्या संदर्भात केलेले विधान; पालघर, तसेच अन्य ठिकाणी साधू-संत यांवर होणारी आक्रमणे, तसेच अन्य चालू घडामोडी यांच्यावर अधिवक्त्यांनी सामाजिक माध्यमांतून व्यक्त व्हावे.

कोरोनामुळे आर्थर रोड कारागृहातील बंदीवानांचे मृत्यू झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधिज्ञ परिषद

११ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आर्थर रोड कारागृहातील कर्मचारी आणि बंदीवान मिळून १८० जणांची कोरोना चाचणी केली केली असता त्यामध्ये १५८ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. हे अत्यंत गंभीर आहे.

कोरोनाच्या काळात व्यत्यय आणणार्‍या विशिष्ट जातीतील समाजद्रोह्यांवर कठोर कारवाई करा !

एकीकडे पंतप्रधानांपासून ते सुजाण नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस शिपाई यांच्यापर्यंत सर्वजण कोरोनाशी लढा देण्यासाठी दिवसरात्र झटत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी या लढ्यात व्यत्यय आणण्याचे काम एका विशिष्ट जातीतील समाजद्रोही करत आहेत.

पालघर येथील साधूंच्या हत्या आणि अधिवक्ता दिग्विजय त्रिवेदी यांचा संशयास्पद मृत्यू यांची चौकशी सीबीआयला सोपवावी ! – हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात १६ एप्रिल २०२० या दिवशी संन्यासी श्री कल्पवृक्षगिरी महाराज, (वय ७० वर्षे) आणि श्री सुशीलगिरी महाराज (वय ३० वर्षे) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अधिवक्ता म्हणून न्यायालयात या साधूंचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता दिग्विजय त्रिवेदी यांचे १३ मे या दिवशी डहाणू न्यायालयात जात असतांना वाहन अपघातात निधन झाले.