‘बी’ न्यूजच्या ‘संवाद-प्रतिवाद’मध्ये मंदिर महासंघ आणि कुंभमेळा यांवर विशेष कार्यक्रम !

‘संवाद-प्रतिवाद’या कार्यक्रमात डावीकडे श्री. किरण दुसे, मध्यभागी श्री. चारुदत्त जोशी आणि श्री. सुनील घनवट (उजवीकडे)

कोल्हापूर – येथील वृत्तवाहिनी ‘बी’च्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात वाहिनीचे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट अन् हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वय श्री. किरण दुसे यांची विशेष मुलाखत घेतली. यात मंदिर महासंघाची स्थापना, त्याचा उद्देश आणि आवश्यकता, मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी मंदिर महासंघाची भूमिका, कुंभमेळा का साजरा केला जातो आणि त्याची आवश्यकता, ‘वक्फ’चे मंदिरांच्या भूमीवर होत असलेले आक्रमण, त्या अनुषंगाने भाविकांच्या मनात असणारे विविध प्रश्न यांवर संवाद साधण्यात आला.

हा संवाद पुढील लिंकवर उपलब्ध आहे : https://youtu.be/K5v94cIzLwQ?si=__KZJ4_rToZUy_o2