Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला गुरुकार्ष्णि शरणानंद महाराज आणि महंत बालकनाथ यांचे आशीर्वाद !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाकुंभक्षेत्री साधू-संतांच्या भेटी घेतल्या.

गुरुकार्ष्णि शरणानंद महाराज यांच्याशी बोलतांना श्री. सुनील घनवट
महंत बालकनाथ यांना समितीचे कार्य सांगतांना श्री. सुनील घनवट

गोकुळ महावन, वृंदावन, मथुरा येथील सुप्रसिद्ध ‘उदासीन श्री गुरुकार्ष्णि स्वर्गाश्रमा’चे पीठाधिश्‍वर शरणानंद महाराज, तसेच राजस्थान येथील ‘महंत श्री बाबा मस्तनाथ मठा’चे महंत, ‘बाबा मस्तनाथ विश्‍वविद्यालया’चे कुलगुरु आणि भाजपचे आमदार महंत बालकनाथ यांनी समितीच्या कार्याला आशीर्वाद दिले.