
पुणे, २८ मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘पुणे सार्वजनिक सभा’ यांच्याकडून ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेणार्या कै. ग.वा. जोशी यांनी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था मागील १५४ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून संस्थेकडून समाजात नैतिक मूल्य जपणार्या अन् ती वाढवणार्या व्यक्तींना ‘रमाबाई रानडे’ हा पुरस्कार दिला जातो. संस्थेचे विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ यांनी एकमताने यंदाच्या वर्षी हा पुरस्कार सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांना देण्याचे घोषित केले आहे. २ एप्रिल या दिवशी पुणे सार्वजनिक सभेच्या रामेश्वर मार्केट, विजय मारुति चौक (पुणे) येथील सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.