श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
‘सेवा करतांना मनात प्रतिक्रिया आली, तर ती सेवा भावपूर्ण होत नाही. जेथे प्रतिक्रिया असते, तेथे भाव असू शकत नाही. कृती करतांना आपल्या मनात भाव असेल, तर त्या कृतीत देवत्व येते; म्हणून साधकांनी भावासहित सेवा करायला हवी.