पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारामध्ये ३ विद्यार्थिनींकडे बघून एकाने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर कोणतीही कारवाई न झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू केले. अखेर विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंद घेत विद्यापीठ प्रशासनाने चतु:श्रृंगी पोलिसांमध्ये तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून अश्लील कृत्य करणार्या अनिल गायकवाड या तरुणाला अटक केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या समोर जेवण करून ३ विद्यार्थिनी वसतिगृहाकडे जात होत्या. त्या वेळी मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे बघून अश्लील कृत्य केले. कत्याला जाब विचारला; परंतु ती व्यक्ती पळून गेली. सुरक्षारक्षकांना सांगितल्यावर त्यांनी कारवाई न करता ‘अशा मार्गावरून का जाता ?’, असा प्रश्न विचारला. त्यांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी पळून जाऊ शकला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ‘याविषयी संवेदनशील आहे. चुकीचे वर्तन करणार्या कर्मचार्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल’, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
संपादकीय भूमिकाअसे आंदोलन का करावे लागते ? विद्यापीठ प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? |