उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांना आता ‘गंगा नदी संवर्धन’ विषय शिकवला जाणार !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असा विषय शिकवण्याचे सुचणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! केवळ गंगानदीच नव्हे, तर देशातील प्रत्येक नदीचे संवर्धन कसे करावे ?, हे लहानपणापासून शिकवणे आवश्यक !

‘कोविड-१९’च्या औषध निर्मितीसाठी सरकारने ‘गंगाजल’ वापरून अधिक संशोधन करावे ! – वरिष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता

गंगा नदीने कधीही भेदभाव केला नाही. माझे संपूर्ण भारतियांना आवाहन आहे की, गंगा नदीला सर्वांनी वाचवायला हवे, गंगा नदीची पूजा करायला हवी.

(म्हणे) ‘ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध असल्याने ती प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही !’ – बसपचे उत्तरप्रदेश प्रमुख भीम राजभर यांचा दावा

योगगुरु रामदेवबाबा यांच्या औषधाला त्यांच्या आस्थापनाने ‘कोरोनावरील औषध’ संबोधल्याने त्यावर बंदी घालणारे प्रशासन आता अशांवर काय कारवाई करणार आहे ?

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

गंगा नदीचे माहात्म्य

भारतीय संस्कृतीत कलिमलनाशिनी गंगेचा महिमा अपार आहे. प्राचीन ऋषींनी यामुळे प्रभावित होऊन विविध स्वरूपांत भावपुष्पांजली अर्पण करून स्वतःला कृत्यकृत्य करून घेतले आहे.