पाटलीपुत्र (बिहार) येथे पिकअप व्हॅन पुलावरून गंगानदीत कोसळली !

९ मृतदेह सापडले, तर ११ प्रवासी बेपत्ता

‘एन्.डी.आर्.एफ्.’ चे पथक शोधकार्य करतांना  

पाटलीपुत्र (बिहार) – येथील पीपापूल भागात एक पिकअप व्हॅन पुलावरून थेट गंगानदीत कोसळली. या गाडीमध्ये २० प्रवासी होते. यांतील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे कार्य ‘एन्.डी.आर्.एफ्.’कडून करण्यात येत आहे. एका लग्न समारंभाहून परतत असतांना गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी नदीत कोसळली.