गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘कोरोना’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही ! – संशोधकांचा निष्कर्ष

गंगाजलापासून ‘कोरोनाविरोधी औषध’ बनवण्यावर संशोधन चालू !
गंगानदीच्या पावित्र्यावर शंका घेणारे, तसेच तिच्यावर श्रद्धा असणार्‍या हिंदूंना वेड्यात काढणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ पुरस्कार प्रदान !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी गंगा नदीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘गंगाजला’द्वारे कोरोनावर उपचार करण्यास मान्यता द्या ! – अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते अरुण कुमार गुप्ता यांनी एका संशोधनाच्या आधारे ‘गंगाजलाच्या माध्यमातून कोरोनावर उपचार करणे शक्य आहे’, असा दावा केला आहे.

वाराणसी येथे गंगा नदीचे पाणी हिरव्या रंगाचे झाल्याने चौकशीचा आदेश

प्रदूषणामुळेच अशा प्रकारचा पालट झाला आहे, हे वेगळे सांगायला नको ! प्रदूषणामुळे पंचमहाभूतांमध्ये होत असलेले अनिष्ट पालट रोखण्यासाठी पंचमहाभूतांनीच जर रौद्र रूप दाखवणे चालू केले, तर जगात काय स्थिती निर्माण होईल, याची कल्पना करता येत नाही !

गंगेतून वाहून आलेल्या सहस्रो प्रेतांविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी अपेक्षा होती !

गंगा नदीच्या प्रवाहात सहस्रो प्रेते वाहून आली. हा विषय हिंदुत्वाचा होता. राम मंदिराइतकाच महत्त्वाचा होता. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी आमची अपेक्षा होती,..

विश्‍वव्यापी गंगा

‘गंगा पापविनाशिनी आहे, म्हणून हवी तितकी पापे करून ती एका गंगास्नानाने फेडून टाकली’, असे होत नाही, तर पाप केल्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे, तसेच ‘तसे पाप पुन्हा आपल्याकडून होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. – संकलक

कोविड-१९, निवडणुका आणि कुंभमेळा !

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांची पाठ !

काशीमधील गंगानदीच्या किनारी घाटांवर असणार्‍या स्मशानभूमीवर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे आणले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मृतांचे नातेवाइक अंत्यसंस्कारापासून स्वतःला लांबच ठेवत आहेत.

पाटलीपुत्र (बिहार) येथे पिकअप व्हॅन पुलावरून गंगानदीत कोसळली !

येथील पीपापूल भागात एक पिकअप व्हॅन पुलावरून थेट गंगानदीत कोसळली. या गाडीमध्ये २० प्रवासी होते. यांतील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित बेपत्ता आहेत.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत सहस्रो भाविकांनी तृतीय पवित्र स्नानाचा घेतला लाभ

सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी पवित्र स्नानाला प्रारंभ झाला. प्रथम निरंजनी आणि आनंद आखाडा यांचे, नंतर जुना आखाडा, अग्नि आखाडा, आव्हान आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा यांचे पवित्र स्नान झाले.