सनातन धर्माची सद्यःस्थिती !
‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थक्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’
‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थक्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’
सम्राट राजा कृष्णदेवराय याच्या राजधानीचे शहर म्हणजे विजयनगर. या ठिकाणी हिंदु साम्राज्याने ३५० वर्षे अखंड हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. या नगरीचे आताचे नाव ‘हंपी’ असे आहे.
शतशः पराक्रमी हिंदु राजे, सहस्रशः सेनापती आणि लक्षावधी सैनिक बुद्धोत्तरकाळात परकियांशी विलक्षण झुंजले. ब्रिटिशांचे अनुकरण करून साम्यवादी प्रणालीने आमच्या भारतियांनी त्यांना स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?’
आर्यांचे आक्रमण वा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्हा हिंदूंच्या डोक्यांमध्ये कोंबणे, शाळांमधून शिकवणे, म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे.
चैत्र शुक्ल १५, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती महोत्सव ! या दिवशी अरुणोदयीच हनुमंताचे पूजन करा. कीर्तन, भजन, करा ! स्तोत्रे म्हणा ! सूर्योदयाला गुलाल-पुष्प-लाह्या उधळून जन्मोत्सव करा. सुंठवड्याचा प्रसाद घ्या. उपवास करा. कृष्ण प्रतिपदेला पारायण करा.
‘ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्य आणि त्यानंतर आजवर होणारा एकेक कायदा घेऊन त्याची मीमांसा करू लागले, तर असे स्वच्छ दाखवता येते की, प्रत्येक कायदा हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूने केलेला आहे.
आपल्या पवित्र परंपरा आणि सनातन धर्म यांवरच आमच्या देशाची उभारणी झाली आहे, होणार आहे आणि तशी ती आज करायची आहे. तीच आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे.
श्रीरामासारखा दुसरा आदर्श पती नाही, पुत्र नाही, राजा नाही, मानव नाही आणि शत्रूही नाही. तसा आदर्श आजवर झाला नाही आणि पुढे व्हायचा नाही.’
सत्तेकरता, मतपेटी (व्होट बँक)करता आसुसलेल्या या दुष्ट यच्चयावत् राजकारण्यांनी आमचा भूतकाळ, सनातन धर्म आणि त्याची नाळच आमच्या पिढीपासून तोडून टाकली.
‘गुरुदेव, आपण सगुण आहात; कारण सगुणात वावरतांना दिसता म्हणून; पण आपणाला गुण स्पर्शतच नाही. माया स्पर्शूच शकत नाही.