आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् ‘डी.आर्.डी.ओ.’ने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या सलग ३ यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या. १० आणि ११ जून या दिवशी झालेल्या या चाचण्यांमध्ये इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी लक्ष्य अचूकपणे भेदले.