सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी घेतली देहली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या हितासाठी कार्य करणारे येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम सर्व संबंधित शाळांमध्ये राबवावा ! – सुनील कुर्‍हाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), पुणे जिल्हा परिषद, पुणे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ राबवण्यात येत आहे.

श्रीक्षेत्र पैठण येथे उत्साहात पार पडले ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ !

येथील संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज जन्मसंस्थान (आपेगांव) फड, श्री गाढेश्‍वर मंदिराजवळील माऊली स्थानिक भूमीत २६ मार्चला दुपारी ४ वाजता संत श्री एकनाथ षष्ठी सोहळ्याच्या निमित्ताने ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ मोठ्या उत्साही अन् भावपूर्ण वातावरणात पार पडले.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनावर योग्य ती कृती करा !

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करणे या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जत येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते.

सर्व हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी केले आहे ! – स्वामी अखंडानंददास महाराज, अखंड महायोग, ऋषिकेश

आज सर्वांत मोठा प्रश्‍न आहे तो म्हणजे हिंदूंना वाचवणे, त्यांचे रक्षण करणे. केरळ येथील शबरीमला मंदिर आणि काश्मिरी हिंदू यांचा विषय आपला आहे, असे काहीजणांना वाटत नाही. हिंदू विभागले गेले आहेत. आपण असेच राहिलो, तर लवकरच अल्पसंख्यांक होऊ.

सनातनच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे ! – ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज, पंढरपूर

सनातन संस्थेने भारतीय संस्कृतीवर आधारित प्रदर्शन लावल्यामुळेे आपल्या परंपरांचे महत्त्व लोकांना कळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज ….

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले. ३१ जानेवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन आणि हिंदु जनजागृती समितीचे ….

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला येथून जावेसे वाटत नाही ! – महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज, कानपूर, उत्तरप्रदेश

येथील सनातनचे प्रदर्शन पाहून पुष्कळ प्रसन्नता वाटली. तुम्ही एवढा प्रचार करत आहात, त्यामुळे विश्‍वात तुमच्या कार्याला यश अवश्य मिळेल. या प्रदर्शनात विविध ग्रंथांतून माहिती देऊन तुम्ही हिंदुत्व जागृत करत आहात. मला आतून एवढा आनंद झाला आहे की, येथून मला जावेसे वाटत नाही

सनातनमधील शिकवणीचा अनुभव घेऊन साधना केल्यास साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील ! – सुनील ठाकूर, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज (जिल्हा रत्नागिरी)

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे स्वीय्य साहाय्यक श्री. सुनील ठाकूर आणि कार्यकर्ते श्री. राजन बोडेकर यांनी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास नुकतीच भेट दिली.


Multi Language |Offline reading | PDF