वाराणसी येथे गंगा नदीचे पाणी हिरव्या रंगाचे झाल्याने चौकशीचा आदेश

प्रदूषणामुळेच अशा प्रकारचा पालट झाला आहे, हे वेगळे सांगायला नको ! प्रदूषणामुळे पंचमहाभूतांमध्ये होत असलेले अनिष्ट पालट रोखण्यासाठी पंचमहाभूतांनीच जर रौद्र रूप दाखवणे चालू केले, तर जगात काय स्थिती निर्माण होईल, याची कल्पना करता येत नाही ! त्यापूर्वीच मनुष्याने शहाणपणा दाखवून प्रदूषण रोखले पाहिजे !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील गंगा नदीचे पाणी अचानक हिरव्या रंगाचे दिसू लागल्याने प्रशासनाकडून याची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासाठी जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ५ जणांचे एक पथकही सिद्ध करण्यात आले आहे. येत्या ३ दिवसांत हे पथक जिल्हाधिकार्‍यांना चौकशी अहवाल सादर करणार आहे.