मुझफ्फरपूर (बिहार) येथे मेंदूज्वरामुळे १०८ हून अधिक मुलांचा मृत्यू

येथे आतापर्यंत मेंदूज्वरामुळे १०८ हून अधिक लहान मुले दगावली आहेत. या घटनेला ९ दिवस उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी येथील २ रुग्णालयांना भेट देऊन आजारी मुलांची चौकशी केली.

बंगालला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्याने जनता दल (सं)च्या प्रवक्त्याला द्यावे लागले त्यागपत्र

जनता दल (संयुक्त) या पक्षाची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, याचे हे उदाहरण होय. धर्मांधांच्या धर्मांधतेविषयी परखडपणे मते मांडल्यास त्या पक्षातील पदाधिकार्‍याला पद गमवावे लागते, यावरून हा पक्ष अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी किती लाचार आहे, हे दिसून येते !

(म्हणे) ‘याला सरकार नव्हे, तर नशीब उत्तरदायी !’ – बिहारचे आरोग्यमंत्री

बिहारमध्ये मेंदूज्वरने ६७ बालकांचा मृत्यू : अशा प्रकारचे स्वतःचे दायित्व झटकणारे जनता दल(संयुक्त)चे मंत्री लोकशाही निरर्थक ठरवतात !

बंगालमध्ये बॉम्बस्फोटाद्वारे तृणमूल काँग्रेसच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या

येथे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात तृणमूल काँग्रेसचे ३ कार्यकर्ते ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये खैरुद्दीन शेख आणि सोहेल राणा यांचा समावेश आहे. या हत्येसाठी तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला उत्तरदायी ठरवले आहे.

अभ्यासदौर्‍याच्या नावाखाली मणीपूर येथे गेलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराचा तरुणीसमवेत अश्‍लील नृत्य करतांनाचा ‘व्हिडिओ’ प्रसारित

अनेक आमदार, खासदार, मंत्री देश-विदेशात अभ्यासदौर्‍याच्या निमित्ताने जात असतात; मात्र ते नेमका काय अभ्यास करतात आणि त्याचा लाभ जनतेला किती होतो, हे अद्यापपर्यंत एक कोडेच राहिले आहे ! त्यामुळे आता या व्हिडिओतून हे ‘अभ्यासदौरे असे असतात का’, असे जनतेला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

जदयुचे नेते प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेणे, याचा पक्षाशी संबंध नाही ! – नितीश कुमार

जदयुचे नेते आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण हे वर्ष २०२१ मध्ये बंगालमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला साहाय्य करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुझफ्फरपूर (बिहार) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव तथा अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी मुझफ्फरपूर येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

भूमी बळकावण्याच्या संशयावरून आदिवासींनी नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना बाण मारून पळवून लावले !

बिहार-बंगाल राज्यांच्या सीमेवर धुलबरी गावात काही मुसलमान येथील चहाच्या मळ्यात नमाजपठणासाठी गेले होते. तेव्हा येथील आदिवासींना वाटले की, ते त्यांची भूमी बळकावण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आदिवासींनी धनुष्य बाणांद्वारे मुसलमानांवर आक्रमण केले.

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याविषयी विचार करा !’ – बिहारचे जदयुचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपला सल्ला

भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना पक्षातून काढले, तरी ‘नथुराम गोडसे प्रखर देशभक्तच होते’, अशीच इतिहासात त्यांची नोंद होईल’ हे नितीश कुमार यांनी लक्षात ठेवायला हवे !

बिहारमध्ये मद्यबंदी असतांना बाहेरील राज्यांतून मद्य कसे पोचते ?

न्यायालयाने असे प्रश्‍न विचारण्याऐवजी थेट संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यायला हवा, असेच जनतेला वाटेल ! अन्यथा राज्यात मद्यबंदीच्या नावाखाली मद्याचे अवैधरित्या वितरण चालूच राहील ! न्यायालयाला जे प्रश्‍न पडतात, ते सरकारला का पडत नाहीत? कि सरकार मद्याच्या नशेत असते ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now