विश्वव्यापी गंगा
‘गंगा पापविनाशिनी आहे, म्हणून हवी तितकी पापे करून ती एका गंगास्नानाने फेडून टाकली’, असे होत नाही, तर पाप केल्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे, तसेच ‘तसे पाप पुन्हा आपल्याकडून होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. – संकलक