हिंदु साधू-संतांवर टीका करणारे चित्रपट निर्माते अन्य धर्माच्या धर्मगुरूंवर टीका करण्याचे धाडस दाखवतील का ? – अभिजीत बोराटे, अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य युवा संघ

‘लाल कप्तान’ या आगामी चित्रपटात नागा साधूंचा अवमान करण्यात आला आहे. हा चित्रपट आम्ही आमच्या भागातील कोणत्याही चित्रपटगृहात चालू देणार नाही. इतर धर्मांचे धर्मगुरु चांगले; पण हिंदू साधू हे लंपट आणि स्वार्थी अशी प्रतिमा उभी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा ‘एकेरी’ उल्लेख करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ! – विशालसिंह राजपूत, शिवसेना आणि राजपूत सेना

हिंदुरक्षक महाराणा प्रताप नसते, तर आज हिंदु समाज अस्तित्वात नसता. महाराणा प्रताप यांची महानता लक्षात घेता ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात जो एकेरी उल्लेख करण्यात आला होता, त्यातून त्यांचा अवमानच झाला आहे. यासाठी महाराणा प्रताप यांचा चुकीचा उल्लेख करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

सीबीआयने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावरील सर्व आरोप त्वरित मागे घ्यावेत !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणाची दिशाहीनता न्यायालयासमोर मांडून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी अन्वेेषण यंत्रणांचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड केला.

यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला नागरिकांचा स्वाक्षरीद्वारे उत्स्फूर्त पाठिंबा

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना त्वरित सन्मानाने मुक्त करावे, ही मागणी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज आंदोलन

डोंबिवली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी व्हा !

डोंबिवली येथे हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना झालेल्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन करण्यासाठी २७ मे या दिवशी रामनगर पोलीस ठाण्यात रितसर अनुमती मागितली होती

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलने अन् निवेदने

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहरातील राजकमल चौक येथे २९ मे या दिवशी आंदोलन करण्यात आले.

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलने अन् निवेदने

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी अनेक वर्षे हिंदु समाजाची नि:स्वार्थ भावाने सेवा केली आहे. अशी व्यक्ती कधी चुकीचे कृत्य करू शकत नाही. अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करून केंद्रीय अन्वेषण विभागाने एकप्रकारे हिंदुत्वाला उघड आव्हान दिले आहे, असे आम्ही समजतो.

राष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा !

मुंबई येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्र्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांची त्वरित मुक्तता करावी, अशी एकमुखी मागणी ठाणे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलनाद्वारे करण्यात आली.

हिंदूंना निःस्वार्थपणे साहाय्य करणारे अधिवक्ता पुनाळेकर यांची लवकर सुटका करावी ! – विजय जयस्वाल, अध्यक्ष, हिंदू रक्षा कृती समिती

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे आणि श्रीरामपूरचे जिव्हाळ्याचे संपर्क आहेत. श्रीरामपूर असो किंवा नेवासा असो, त्यांनी वेळोवेळी आणि निःस्वार्थपणे हिंदूंना साहाय्य केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF