‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदे त्वरित करा !

  • बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

  • वक्फ कायदा रहित करण्याचीही मागणी

आंदोलनात उपस्थित राष्ट्र आणि धर्मप्रेमी

बांदा – कट्टा कॉर्नर, बांदा येथे १५ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी ‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत’, तसेच वक्फ कायदा रहित करावा, अशा मागण्या शासनाकडे केल्या.
सहभागी झाले होते.

या वेळी डेगवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंत देसाई, इन्सुली येथील सौ. प्रिया स्वागत नाटेकर, पडवे, माजगाव येथील कु. स्वरदा साबाजी देसाई, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर आणि श्री. शिवराम देसाई यांनी राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी प्रबोधन केले. या आंदोलनात ७० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

या वेळी उपस्थित वक्त्यांनी देशातील धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांची भीषणता लक्षात आणून देतांना सांगितले की, आर्थिक प्रलोभने, भावनिक जाळे आणि बळजबरी आदी अनेक माध्यमांतून गरीब आणि असाहाय्य हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’, असल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज येत आहे. धर्मांतराचे प्रकार राज्यघटनेच्या विरोधात तर आहेच, तसेच मानवतेलाही काळीमा फासणारे आहेत. हे एक मोठे राष्ट्रविरोधी षड्यंत्र आहे. त्यामुळे याविरोधात त्वरित कायदा केला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’च्या घटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावती यांसह महाराष्ट्रासह देशभरात उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे या विरोधात त्वरित कायदा केला पाहिजे.