हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

जळगाव, ९ सप्टेंबर (वार्ता.) – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांतरित करावेत, झारखंड येथील अंकिताचा मारेकरी शाहरुखला फाशीची शिक्षा द्यावी अन् धानोरा (जळगाव) येथे गणेशभक्तांवर अमानुष लाठीमार करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करावे, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केल्या आहेत. ते ८ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात बोलत होते. त्यानंतर एका शिष्टमंडळाने उपरोक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

श्री. जुवेकर पुढे म्हणाले की, आमदार टी. राजासिंह यांना २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथियांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना पुन्हा २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष कारागृहामध्ये अडकवून ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे. त्यांना धमक्या देणार्‍या धर्मांधांना आणि त्यांना पाठीशी घालणार्‍यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.

या आंदोलनात जळगाव मधील हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी समाजसेवक आनंद मराठे, भुसावळ येथील  श्री. भूषण महाजन आणि हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी यांनीही मनोगत व्यक्त केले.