लवकरच निधी देण्यात येईल ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
कर्मचार्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम न भरणारे अधिकारी आणि राज्य परिवहन मंडळाचे प्रमुख यांवर कारवाई करणार का ?
कर्मचार्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम न भरणारे अधिकारी आणि राज्य परिवहन मंडळाचे प्रमुख यांवर कारवाई करणार का ?
चौकशीच्या अहवालानुसार, एस्.टी. महामंडळाने बसस्थानकावर कार्यरत असलेल्या २२ सुरक्षारक्षकांचे तातडीने स्थानांतर करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना संबंधित सुरक्षा मंडळाला देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एस्.टी. महामंडळाच्या मिनी बसेस (लहान बसगाड्या) येणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
अशी मागणी का करावी लागते ?
हे पूर्वीच का केले नाही ? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सरकार का जागे होते ?
लाडक्या बहिणींना बसमध्ये ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य बस सवलत यांमुळे एस्.टी. तोट्यात गेली आहे. अशी सवलत सर्वांना देत बसलो, तर एस्.टी. महामंडळ चालवणे कठीण होईल.
राज्य परिवहन महामंडळात ऑक्टोबर महिन्यापासून प्रॉव्हिडंट फंडाचे (भविष्य निर्वाह निधीचे) पैसे दिले जात नाहीत. महामंडळाने कर्मचार्यांचे हफ्ते न भरल्यामुळे कर्मचार्यांना पैसे काढता येत नाहीत.
एस्.टी. महामंडळाने तिकीट दरवाढ रहित करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कागल येथे बसस्थानकात २८ जानेवारीला ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे भाडे वाढणार आहे, याची कल्पना नव्हती, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. मी परिवहनमंत्री असेपर्यंत भाडेतत्त्वावर बस घेणार नाही.
येत्या ५ वर्षांत स्वमालकीच्या २५ सहस्र नव्या लालपरी बसगाड्या घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे, असे विधान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. २७ जानेवारी या दिवशी परिवहन विभागाची आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते.