मुलींच्या रक्षणासाठी ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

 ‘तरुण हिंदू’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटनांच्या वतीने धनबाद (झारखंड) येथे ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’चे आयोजन

‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त सहभागी झालेले ‘तरुण हिंदू’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटनांचे कार्यकर्ते

धनबाद (झारखंड) – मुंबईतील हिंदु तरुणी श्रद्धा वालकर हिची हत्या करणारा नराधम आफताब पूनावाला आणि उत्तरप्रदेशमधील निधी या हिंदु तरुणीने धर्मांतरास नकार दिल्याने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची हत्या करणारा सुफीयान या दोघांना फाशी देण्यात यावी, तसेच देशभरात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी’ कठोर कायदा लागू करावा, या मागण्यांसाठी ‘तरुण हिंदू’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटनांच्या वतीने येथील रणधीर चौकात नुकतेच ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनानंतर उपायुक्त संदीप सिंह यांची भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला ‘तरुण हिंदू’चे श्री. उज्वल बनर्जी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री एम्.पी. शर्मा, प्रमोदकुमार श्रीवास्तव, अधिवक्ता सुदीप गुप्ता, समितीचे पूर्व-पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांसह अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.

पूर्व सिंहभूम, जमशेदपूर आणि रांची येथे निवेदन सादर

धनबादचे उपायुक्त संदीप सिंह यांना निवेदन देतांना ‘तरुण हिंदू’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटनांचे कार्यकर्ते

वरील विषयांवर पूर्व सिंहभूम, जमशेदपूर आणि रांची येथील उपायुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. पूर्व सिंहभूममध्ये निवेदन देण्यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या सौ. वंदना राव, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री डी. प्रसाद, आलोक पांडे, जय चक्रवर्ती, सौ. अश्विनी आणि समितीच्या वतीने श्री. बी.वी. कृष्णा उपस्थित होते. रांची येथे निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ सौ. ज्योती ठक्कर, सौ. अनिता केसरी, सर्वश्री आलोक केसरी, राजीव सिंह आणि समितीच्या सौ. पूजा चौहान आदी उपस्थित होते.