छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

सोलापूर, लातूर, तुळजापूर (जिल्‍हा धाराशिव) आणि बीड येथे ‘हिंदु राष्‍ट्र जागृती आंदोलना’द्वारे मागणी !

 

सोलापूर येथील आंदोलनात घोषणा देतांना धर्मप्रेमी

सोलापूर, १६ जुलै (वार्ता.) – छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्‍हा सोलापूर) येथे झालेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनां’त करण्‍यात आली. या वेळी अधिवक्‍त्‍या अर्चना बोगम म्‍हणाल्‍या, ‘‘हिंदु जनजागृती समिती ‘वक्‍फ कायद्या’विषयी समाजात जागृती करत आहे. त्‍यासाठी मी समितीची पुष्‍कळ आभारी आहे.’’

सोलापूर – येथील आंदोलनात अधिवक्‍ता अधिवक्‍त्‍या अर्चना बोगम, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राहुल वडनाल, गोपी व्‍हनमारे, बालराज दोंतुल, धनंजय बोकडे, शिवबा शहापुरे, किशोर जगताप, दत्तात्रय पिसे, सौ. अनिता बुणगे, कु. वर्षा जेवळे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. या वेळी सर्वश्री लक्ष्मीनारायण गोली, शुभम संगा, शरदचंद्र मोगीली, किशोर मादगुंडी, रमेश झुंजा, स्‍वामी विवेकानंद केंद्राचे लक्ष्मीनारायण बामनला यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

लातूर येथील आंदोलनात घोषणा देतांना धर्मप्रेमी

लातूर – येथील आंदोलनात भाजपचे प्रांत अध्‍यक्ष श्री. मनोज सूर्यवंशी, हिंदू रक्षक दलाचे श्री. मनोज डोंगरे, व्‍यापारी श्री. श्‍याम भराडिया, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, सौ. राजश्री देशमुख, सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी, सौ. स्‍वाती सोळंके, तसेच श्री. नागेश विभूते यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. या आंदोलनाला प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. नरेंद्र बोरा, श्री. आनंद मोरे यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

बीड येथील आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी

बीड – येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्‍या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. दिलीप वांगीकर, श्री. सौरभ टाक यांनी मनोगत व्‍यक्‍त केले, तर आंदोलनाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. विपुल भोपळे यांनी केले. या आंदोलनाला अधिवक्‍ता प्रसाद देशमुख, अधिवक्‍ता जगदीश जाजू, श्री नीलकंठेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. संदीप होटकर, श्री. सखाराम बोबडे, सर्वश्री मधुकर नाईक, गोपाळ उनवणे, मनोज छाजेड, मनीष मोंढेकर यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

तुळजापूर येथील आंदोलनात बोलतांना श्री. प्रशांत कदम (सोंजी) आणि उपस्‍थित धर्मप्रेमी

तुळजापूर (जिल्‍हा धाराशिव) – हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, श्री. अमित कदम, जनहित संघटनेचे श्री. अजय (भैय्‍या) साळुंके, श्री. प्रशांत कदम (सोंजी), भाजपचे श्री. सुहास साळुंके, ‘सावरकर विचार मंच’चे श्री. बाळासाहेब शामराज, पुजारी मंडळाचे माजी अध्‍यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. श्री. सर्वोत्तम जेवळीकर यांनी आंदोलनाचे सूत्रसंचालन केले.

विशेष घटना

  • तुळजापूर येथील आंदोलनाच्‍या वेळी दर्शनासाठी आलेले भाविक आंदोलनाचा विषय ऐकून उत्‍स्‍फूर्तपणे निवेदनावर स्‍वाक्षर्‍या करत होते.
  • तुळजापूर येथील स्‍थानिक पुजारी बांधवांचा आंदोलनामध्‍ये लक्षणीय सहभाग होता.
  • तुळजापूर येथील श्री. शिवाजी बोधले यांनी आंदोलनात सहभागी झालेल्‍या सर्व धर्मप्रेमींना स्‍वत: चहा आणून दिला.