गणेशोत्‍सव कालावधीत अन्‍नपदार्थांचा ३१ लाख रुपयांचा साठा शासनाधीन !

गणेशोत्‍सव कालावधीत अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाने पुणे जिल्‍ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गायीचे तूप, भेसळयुक्‍त बटर (लोणी), स्‍वीट खवा आणि वनस्‍पती आदी अन्‍नपदार्थांचा एकूण ३१ लाख २ सहस्र ४७ रुपयांचा साठा शासनाधीन केला असल्‍याची माहिती अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

मिरज येथे ‘डॉल्‍बी’ आणि ‘लेझर लाईट’ विरोधी उत्‍स्‍फूर्त बैठक : चळवळ चालू करण्‍याचा निर्धार !

मशिदींवरील मोठ्या आवाजाचे अनधिकृत भोंगे बंद व्‍हावेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीविषयी आचारसंहिता बनवून त्‍या संदर्भात प्रसार व्‍हावा. या संदर्भात निवेदन देणे.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत (राजस्‍थान) येथे विविध शाळा आणि गणेशोत्‍सव मंडळे यांमध्‍ये प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत भागातील स्‍थानिक शाळा आणि गणेश मंडळे यांच्‍यामध्‍ये ‘आदर्श गणेशोत्‍सव साजरा कसा करावा ?’, याविषयी प्रबोधन करण्‍यात आले.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

‘लेझर लाईट’ ५ मिलीवॅटपेक्षा अधिक होती. ती मनुष्‍याच्‍या डोळ्‍यांवर १० सेकंदासाठी जरी प्रकाशित झाली, तरी त्‍याचा ‘रेटिना’वर परिणाम होऊ शकतो.

पुणे येथे रस्‍त्‍यावर उभारलेले मंडप न काढणार्‍या मंडळांना क्षेत्रीय कार्यालयांकडून नोटीस !

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्‍त माधव जगताप म्‍हणाले की, ‘‘२२ मंडळांनी रनिंग (रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला खांब उभे करून त्‍यावर रंगीत झालर (कापड) लावणे) मंडप काढण्‍यास विलंब केल्‍याने महापालिकेने त्‍यावर कारवाई केली आहे.

अनंतचतुर्दशीच्या निमित्ताने सलग ९ वर्षे कराड येथील कृष्णा घाटावर महाप्रसादाचे आयोजन !

वर्ष २०१५ पासून कृष्णा नदीच्या घाटावर अनंतचतुर्दशीला रणजित पाटील आणि सचिन पाटील बंधूंकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

गणेशोत्‍सवात ‘डीजे’ला फाटा देत वृद्धाश्रमास ५० सहस्र रुपयांचे साहाय्‍य !

रेस्‍ट कँप रस्‍त्‍यावरील ‘बनात चाळ मित्रमंडळा’ने यंदा गणेशोत्‍सवात डीजे वा बँजो (तंतुवाद्य), मिरवणूक व्‍ययाला फाटा देत या रकमेतून पाथर्डी फाटा येथील ‘मानवसेवा केअर सेंटर’च्‍या वृद्धाश्रमाला ५० सहस्र रुपयांचे किराणा साहित्‍य भेट देत माणुसकी जोपासली.

नागदेववाडी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘भगवा रक्षक’च्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या प्रबोधनामुळे श्री गणेशमूर्तींचे १०० टक्‍के विसर्जन !

या कृतींमुळे भाविकांना विसर्जन करण्‍यासाठी साहाय्‍य झाल्‍यामुळे श्री गणेशभक्‍तांमध्‍ये मूर्ती विसर्जन केल्‍याचा आनंद मिळाल्‍यामुळे वातावरण सकारात्‍मक झाले. ‘हे सर्व श्री गणेशाच्‍या कृपेने झाले’, असे ‘भगवा रक्षक’च्‍या कार्यकर्त्‍यांनी सांगितले.

पुणे ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ला श्री गणेशोत्‍सव काळात १९ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न !

गेल्‍या वर्षीपेक्षा यंदा २४ लाख रुपयांची भर पडली आहे. या काळामध्‍ये उपनगरातील नागरिकांसाठी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’च्‍या ६७२ अतिरिक्‍त बसगाड्या चालू करण्‍यात आल्‍या होत्‍या.

नागपूर येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांकडून गोंधळ !

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा !