रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत अधिकचे बसभाडे घेणार्‍या १८ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्‍या परिवहन विभागाचे अभिनंदन !

गणेशभक्तांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटमारीचे विघ्न !

‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’, तसेच अन्य खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ (आरक्षण करणारे अ‍ॅप) यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची लुटमार केली जात आहे.

खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

बसस्‍थानके, खासगी ट्रॅव्‍हल्‍स आणि त्‍यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्‍यात यावा. ‘ट्‍विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्‍यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठीची सदोष ऑनलाईन यंत्रणा राज्यशासन दुरुस्त करणार !

परिवहन आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथील तक्रार निवारण प्रणाली अन् ‘मोबाईल ॲप’ यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यशासनाने एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये संमत केले आहेत, तसेच हे हाताळण्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे देण्यात आले आहे.

सणांच्या काळात अतिरिक्त दर आकारून प्रवाशांना लुटणार्‍या ‘बस ऑपरेटर्स’वर नियंत्रण ठेवा !

अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?

प्रवाशांनी तक्रारी केल्यास वाढीव शुल्क आकारणार्‍या ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई करू ! – शंभूराज देसाई, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन मंत्री

प्रवाशांकडून संबंधित ट्रॅव्हल्स चालकांविरोधाच्या तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.

खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भाडेवाढीविरोधात परिवहन अधिकार्‍यांची ‘नागरिकांनी तक्रार करावी’, अशी अपेक्षा !

असे असले, तरी ज्या गोष्टी प्रशासनाला ठाऊक आहेत, त्याविषयी प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?

सातारा परिवहन कार्यालयाकडून मनमानी भाडे आकारणार्‍या १३१ बसगाड्यांवर कारवाई

१ लाख २६ सहस्र रुपयांची दंड आकारणी

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या ‘ऑनलाईन’ तिकीटदरांवर नियंत्रण ठेवण्यास परिवहन विभाग अपयशी !

‘बुकींग सेंटर’वर शासनमान्य दर असलेल्या गाड्यांच्या तिकिटांची ‘ऑनलाईन’ विक्री दुपटीहून अधिक दराने !