हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १५ नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रहित

हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम

कोल्हापूर येथे १४ नोव्हेंबर या दिवशी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन !

कोल्हापुरात १४ नोव्हेंबर या दिवशी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सर्व स्वामीभक्तांनी या अमृतमय सोहळ्याचा लाभ घेऊन स्वत:च्या जीवनात नवचैतन्य फुलवावे’, असे आवाहन सोहळ्याच्या आयोजकांनी केले आहे.

‘बदायू’चे पूर्वीचे नाव ‘वेदामऊ’ होते ! – योगी आदित्यनाथ

प्राचीन काळामध्ये ‘बदायू’चे नाव ‘वेदामऊ’ होते. ते वेदांच्या अध्ययनाचे स्थान होते. असेही म्हटले जाते की, गंगानदीला पृथ्वीवर आणणारे महाराजा भगीरथ यांनी येथेच तपस्या केली होती, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथे प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक !

प.पू. काणे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नारायणगाव-पुणे येथे रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. श्रीपाद ठुसे आणि सौ. शीतल ठुसे यांनी पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला.

मये ग्रामस्थांच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला भगवान श्रीकृष्ण विजयोत्सव फेरीचे आयोजन

मये ग्रामस्थांच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला ३ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता भगवान श्रीकृष्ण विजयोत्सव फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीला गावकरवाडा येथील श्री महामाया प्रांगणातून सामूहिक प्रार्थना केल्यानंतर प्रारंभ झाला.

विष्णुदास भावे गौरवपदक सोहळा कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे रहित !

‘अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’च्या वतीने प्रतिवर्षी ५ नोव्हेंबर म्हणजेच रंगभूमीदिनी देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरवपदक सोहळा कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे रहित करण्यात आला आहे.

‘कोजागरी पौर्णिमा’ आणि ‘करवा चौथ’ सणांच्या निमित्ताने पार पडला ‘ऑनलाईन’ प्रवचनाचा कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली अन् एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे ‘कोजागरी पौर्णिमा’ अन् ‘करवा चौथ’ यांच्या निमित्ताने एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी  पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ हा कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा !

‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने १९.१०.२०२१ या दिवशी श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी संस्थान, वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सनातनच्या साधकांचाही सहभाग होता.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील ! –  सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे जम्मू आणि काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला सिद्ध राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या सीमा बंद करणे, देखरेख करणे आणि टेहाळणी करणे, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

(म्हणे) ‘बांगलादेशमध्ये कुराणाचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करावा !’

 बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अशा मौलानांवर कधीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! बंगाल हे दुसरे बांगलादेश झाले असल्याने उद्या तेथेही हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे चालू झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !