
अहिल्यानगर : ‘श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट’द्वारे अहिल्यानगरमध्ये प्रथमच जोधपूर (राजस्थान) येथील पूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीने संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदलालजी मणियार यांनी दिली. आजच्या संगणकयुगामधील युवतींना प्रेरणा मिळावी; म्हणून या कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘संत मीराबाईंच्या जीवनचरित्राचे गुणगान पूज्य श्री राधाकृष्णजी महाराजांच्या अमृतवाणीमधून ऐकण्याची पर्वणी अहिल्यानगरकरांना लाभणार आहे. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरासह उपनगरातील भाविकांनी विशेषतः युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.